April 1, 2023

अगोदर मुलाची अन नंतर बापाची आत्महत्या !

अगोदर मुलाची अन नंतर बापाची आत्महत्या !

धारूर- कौटुंबिक कलहातून 28 वर्षीय मुलाने विष पिऊन आत्महत्या केल्यानंतर अवघ्या आठच दिवसात वडिलांनी देखील गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याने धारूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाप आणि लेकाच्या या निर्णयामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

धारुरच्या बस स्थानक परिसरात श्रीकृष्ण मोहन चोले (वय 27 वर्षे) या युवकाने आठ दिवसांपुर्वीच शुक्रवारी (दि.8) विष घेवून आत्महत्या केल्‍याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरासह आसोला गावात एकच खळबळ उडाली होती. सदर युवकाने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात असताना मृत तरुणाच्या वडिलांनी रात्री कोळपिंपरी शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे.

तरुणाने धारुर बस स्थानक परिसरात विषारी औषध घेवून आत्महत्या केली. त्यावेळी तरुणाचे पिता मोहन पंढरी चोले (वय 50) हे आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला गेलेले होते. घटनेची माहिती कळताच ते परतले होते. मुलाच्या आत्महत्येच्या घटनेला आठ दिवस होत नाहीत तोच मोहन चोले यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे आसोला गावात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, गावात उलटसुलट चर्चा होत आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click