December 10, 2022

गोगलगायी च्या हल्ल्यात सोयाबीन उध्वस्त !

गोगलगायी च्या हल्ल्यात सोयाबीन उध्वस्त !

बीड- जिल्ह्यातील सोयाबीन च्या पिकाला गोगलगायी चा मोठा फटका बसला आहे,अडीच लाख हेक्टर पैकी जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे.कृषी विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.तातडीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या पावसानंतर तब्बल सात 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी पाच लाख 55 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.यातील 2 लाख 31 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन ची लागवड झाली आहे.

बीड जिल्ह्यातील विशेषतः अंबाजोगाई, परळी,धारूर आणि केज तालुक्यात सोयाबीन ची लागवड मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी या तालुक्यात सोयाबीन च्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.

मात्र यावर्षी सोयाबीन ला गोगलगायी चा प्रादुर्भाव जाणवत आहे.शंख गोगलगायी च्या वाढत्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे उगवण सुरू असलेले पीक नुकसान होत आहे.कृषी विभागाने याबाबत मार्गदर्शन मेळावे,परिसंवाद घेतले मात्र प्रत्यक्षात बांधावर जाऊन या गोगलगायी चा बंदोबस्त करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान सोयाबीनच्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत घ्यावी अशी मागणी माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे तर बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करावेत अन तातडीने मदत द्यावी अशी मागणी बीडच्या खा डॉ प्रीतम मुंडे यांनी केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click