परळी- अमरनाथ यात्रेसाठी गेलेले परळी येथील तब्बल 24 भाविक हे सुखरूप असून पहेलगाम या ठिकाणी आहेत.बीड जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात असून परवानगी मिळाली तरच ते पुढील यात्रेसाठी जाणार आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच यात्रा महोत्सव बंद आहेत.त्यामुळे यावर्षी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेसाठी एकत्र येतात.बीड जिल्ह्यातून देखील शेकडो भाविक जातात.आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील 38 भाविक या ठिकाणी झालेल्या ढगफुटी मध्ये अडकल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आणखी किती भाविक या ठिकाणी गेले आहेत याची माहिती घेतली.
आष्टी सोबतच परळी येथील देखील 24 भाविक अमरनाथ यात्रेला गेलेले आहेत.यामध्ये संतोष अप्पा चौधरी..शौलेशभैय्या कदम..किशन सपाटे..अविनाश चौधरी..संतोष साबळे..अनंत बंडगर…रतनेश बेलुरे..रघुनाथ शिरसाठ…विशाल नरवणे..सोमनाथ गित्ते..सूरज भंडारी..महेश अण्णा शिरसाठ ..गजानन हालगे..ज्ञानेश्वर साबळे विठ्ठलराव साबळे..रामदासराव काळे..पद्माकर काळे..अविनाश वडुळकर..नारायण चौलवार ..गजानन कुळकर्णी..आनंद अल्बिदे..धनंजय माळी रमेश अण्णा संकले.. दीपक मोडीवळे..यांचा समावेश आहे.
हे सर्व भाविक हे सध्या पहेलगाम या ठिकाणी असून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तरच ते पुढील यात्रेसाठी रवाना होतील अन्यथा परत येतील अशी माहिती आरडीसी राऊत यांनी दिली.