December 10, 2022

आरक्षणाशिवाय निवडणूक नको !मुंडे बंधू भगिनींची मागणी !!

आरक्षणाशिवाय निवडणूक नको !मुंडे बंधू भगिनींची मागणी !!

परळी – ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झालेल्या निवडणुका घेऊ नयेत अशी ठाम भूमिका भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे आणि माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.आरक्षणाच्या विषयावर विविध ओबीसी नेते स्पष्टपणे भूमिका घेत असल्याने आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील 92 नगर परिषद व 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, या निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असुन त्यात, ओबीसी आरक्षण संदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे व त्यामुळे नवीन सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही पूर्ण केली पाहिजे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

इंपेरिकल डेटाच्या टोलवा टोलवी वरून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, त्यावर धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण बहाल झाल्याशिवाय निवडणुका झाल्या तर ओबीसी समाजातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर तो एक प्रकारचा अन्याय ठरेल, असे मत यापूर्वीही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले होते.

दरम्यान नवीन सरकारने राज्यात सत्तारूढ होताच ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून बैठका घेऊन एक प्रकारची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला होता. मात्र निवडणूक आयोगाने आरक्षणाचा तिढा सुटलेला नसताना नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका घोषित केल्याने, विविध स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे, त्यातच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील ओबीसींचे राजकीय आरक्षण जाहीर झाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ नयेत, ही आपली ठाम भूमिका असल्याचे म्हटले आहे.

भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील ट्विटरवर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.नूतन मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री हे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click