August 16, 2022

आरोग्य विभागातील गोलमाल विधिमंडळात गाजणार !

आरोग्य विभागातील गोलमाल विधिमंडळात गाजणार !

बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील बेकायदेशीर सेवक भरती प्रकरण विधीमंडळात गाजण्याची चिन्हे आहेत.बीडचे आ संदिप क्षीरसागर यांच्यासह इतर आमदारांनी हा घोटाळा लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडण्याची तयारी केली आहे.त्यामुळे या प्रकरणातील दोषींचे धाबे दणाणले आहेत.

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सुभाष सोनवणे या दिव्यांग उमेदवाराला नियम डावलून नोकरी दिली.हा सगळा प्रकार न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणला. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी जिल्हा निवड समितीने मान्यता द्यावी लागते.

बीडच्या आरोग्य विभागाने मात्र सोनवणे ला नोकरी देताना केवळ लक्ष्मीदर्शनाचा आदर केला बाकी सगळे नियम गुंडाळून ठेवले.या सगळ्या बाबत बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी लक्षवेधी उपस्थित केली आहे.त्यांच्यासोबत मराठवाड्यातील इतरही काही आमदारांनी या विषयात प्रश्न उपस्थित केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असतानाही सीईओ अजित पवार यांना अंधारात ठेवून बेकायदेशीर काम करणाऱ्या डॉ गित्ते अँड कंपनीला सीईओ पवार का पाठीशी घालत आहेत हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click