December 6, 2022

वाळू माफियांची दादागिरी !पोलिस ठाण्यातून ट्रॅक्टर गायब !!

वाळू माफियांची दादागिरी !पोलिस ठाण्यातून ट्रॅक्टर गायब !!

बीड- गेवराई विधानसभा मतदार संघातील दगडी शहाजानपूर येथील नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर वर पोलिसांनी कारवाई केली,मात्र वाळू माफियांनी पोलिसांशी संगनमत करून जप्त केलेल्या ट्रॅक्टर चे मुंडके काढून नेत दुसरे मुंडके लावल्याचा प्रकार घडला आहे.पोलीस मात्र यावर मूग गिळून गप्प आहेत.

बीड तालुक्यातील दगडी शहाजानपूर (चकला) येथे तीन महिन्यांपूर्वी वाळू माफियांनी सिंदफणा नदीपात्रात केलेल्या खड्या मध्ये बुडून चार बालकांचा जीवगेला होता.त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भेट देऊन हे खड्डे बुजवून घेत कारवाईचे आदेश दिले होते.

या प्रकारानंतर वाळू माफियांवर कारवाई होईल अशी अपेक्षा होती.मात्र त्यानंतर देखील वाळू चोरी सर्रास सुरूच होती.दरम्यान चार दिवसांपूर्वी वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पकडून मादळमोही पोलिसांच्या ताब्यात दिले.हे ट्रॅक्टर गावातीलच उपसरपंच शरद यमगर याचे होते.

2 जुलै रोजी जप्त करून ठाण्यात लावण्यात आलेले हे ट्रॅक्टर पहा ज्याचे हेड नवीन आहे.
आता हे ट्रॅक्टर पहा,ज्याला रात्रीतून जुने हेड लावण्यात आले.हा सगळा खेळ ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात असताना झाला आहे हे विशेष. याचाच अर्थ पोलिसांच्या संमतीशिवाय हा हेड बदलण्याचा खेळ झालेला नाही हे नक्की .

पोलिसांनी जे दोन ट्रॅक्टर जप्त केले त्यातील एका ट्रॅक्टर चे मुंडके ( हेड ) रात्रीतून गायब झाले.अन त्याजागी दुसरे जुने मुंडके लावण्यात आल्याचे समोर आले आहे.विशेष बाब म्हणजे नवे मुंडके याची काय अन जुन्या मुंडक्याची सुद्धा कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे नसल्याची माहिती आहे.

पोलीस ठाण्यात लावलेल्या ट्रॅक्टर चे हेड बदलण्याची हिंमत पोलिसांच्या सहकार्याशिवाय होऊच शकत नाही.या सगळ्या प्रकाराबाबत नूतन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी खात्री करणे आवश्यक आहे. एकीकडे वाळू माफियांवर कारवाई करण्याची गरज असताना पोलिसच जर ठाण्यातून जप्त केलेल्या वाहनाचे हेड बदलून देत असतील तर या अवैध धंदे करणाऱ्यांवर वचक कसा राहणार हा प्रश्नच आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click