January 30, 2023

गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !

गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !

सांगली- गुप्तधन काढून देण्यासाठी मांत्रिकाला तब्बल 70 ते 80 लाख रुपये दिले.हे पैसे सावकाराकडून घेतले होते,सावकार तगादा लावू लागल्याने मांत्रिकाला वारंवार विचारणा सुरू झाली,शेवटी हा तगादा सहन न झाल्याने मांत्रिकाने मित्राच्या मदतीने तब्बल नऊ जणांना जेवणातून विष देऊन त्यांचा खून केला.ही थरारक घटना उघडकीस आली आहे सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे.

कोट्यवधींचे गुप्तधन मिळवून देतो म्हणून अब्बास बागवान याने वनमोरे कुटुंबियांना त्यांच्या जाळ्यात ओढले. गुप्तधनाच्या आशेने त्यांनी अब्बास बागवान याला तब्बल ७० ते ८० लाख रुपये दिले होते. त्यासाठी वनमोरे कुटुंबियांनी त्यांच्या नातेवाईकांसह खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. काही दिवसांत पैसे देतो म्हणून घेतलेली रक्कम परत मिळत नसल्याने सावकारांनी वनमोरे कुटुंबियांकडे तगादा लावला होता. तर त्यांनी अब्बास यांनाही संपर्क साधून गुप्तधनाविषयी सातत्याने विचारणा केली होती. अनेक दिवस झाल्यानंतरही गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे कुटुंबियांनी अब्बास याच्याकडे पैशांची मागणी केली.

घेतलेली एवढी मोठी रक्कम परत द्यावी लागेल, त्यातून आपला भोंदूपणा उघड होईल म्हणून अब्बास बागवान व धीरज सुरवसे या दोघांनी वनमोरे कुटुंबियांना महापूजेसाठी जमा केले. त्यानंतर जेवणातून ना रंग ना वास असलेले विष देऊन पोपट यल्लाप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, अर्चना पोपट वनमोरे, शुभम पोपट वनमोरे, माणिक यल्लाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, आदित्य माणिक वनमोरे, अनिता माणिक वनमोरे आणि अक्काताई वनमोरे या नऊ जणांना संपविले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांसमोर आली आहे. त्या दोघांनाही सांगली पोलिसांनी अटक केली असून उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

वनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी सर्वच बाजूंनी तपास सुरु ठेवला. घटनास्थळावरून त्यांना एक चारचाकी जाताना दिसली. एमएच-१३ पासिंग असल्याने सांगली पोलिसांनी ती गाडी कोणाची आहे, याचा तपास केला. तर वनमोरे यांच्या मोबाईलवरून ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, याचा ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स) काढला. त्यावेळी वनमोरे यांनी अब्बास व धीरज यांच्याशी संपर्क केल्याची माहिती समोर आली. पण, त्यांनी सांगलीतील एका व्यक्तीच्या नावे सीमकार्ड घेतले होते. त्यामुळे त्या दोघांचा पूर्वनियोजित कट होता, असाही पोलिसांना संशय आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click