सांगली – एकाच कुटुंबातील नऊ जणांनी मृत्यूला कवटाळल्याने एकच खळबळ उडाली होती. वनमोरे कुटुंबातील या घटनेमागे सावकारीचा पाश असल्याचे उघड झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.नऊ जणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.याबाबत पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी माहिती दिली.
म्हैसाळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. या घटनेने संपूर्ण राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या केली असावी, अशी अटकळ बांधली गेली. घटनास्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकांकडून अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होते. नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने झाली, हा घातपात आहे, की नेमकी आत्महत्या की आणखी काय आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क देखील व्यक्त करण्यात येत होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झाले होते. या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं.
पण आता म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली आहे