अंबाजोगाई- बोगस बिले काढण्यासाठी गुत्तेदार आणि कार्यकर्ते आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे आपल्याला पिस्तुलचा परवाना देण्यात यावा अशी मागणी करून खळबळ उडवून देणारा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात अडकला आहे संजय कुमार कोकणे असे अटक झालेल्या अभियंत्यांचे नाव असून त्याने वीस हजाराची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या कामाची बिले अदा करण्यासाठी संजय कुमार कोकणे याने लाचेची मागणी केली होती याबाबत केदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर खात्री करून विभागाने सापळा रचला आणि कोकणे यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली
विशेष बाब म्हणजे अंबाजोगाई कार्यकारी अभियंता पदी रुजू झाल्यानंतर अवघ्या काहीच दिवसात याचा कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पिस्तूल ची मागणी केली होती काही गुप्तता आणि कार्यकर्ते हे आपल्याला बिले काढण्यासाठी धमकावत आहेत त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे म्हणूनच आपल्याला पिस्तुलचा परवाना देण्यात यावा अशी मागणी या अभियंत्यांनी केली होती त्यानंतर बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मोठी खळबळ उडाली होती पालकमंत्री धनंजय मुंडे यांना याबाबत पत्रकारांसमोर येत खुलासा करण्याची वेळ या कोकणे महाशय यामुळे आली होती