November 26, 2022

करुणा मुंडे – शर्मा ला अटक !

करुणा मुंडे – शर्मा ला अटक !

पुणे – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वर आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या करुणा मुंडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.अट्रोसिटी प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती अशी की,फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. त्या आपली ओळख करुणा मुंडे असे करुन दिली. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्मा यांच्या घरी राहू लागला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायिक झाले. पती हा शर्मा यांच्याशी वारंवार बोलत होता. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले.

येथे करुणा शर्मा यांनी हाॅकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. घटस्फोटासाठी महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह शर्माविरुद्ध ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. अजयकुमार विष्णू देडे (वय 32, रा.शिवाजीनगर, उस्मानाबाद), करुणा शर्मा (वय 43, रा.सांताक्रुज, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click