बीड- जिल्हाधिकारी, सीईओ यांना अंधारात ठेवून केलेली बेकायदेशीर नोकर भरती नीटनेटकी करण्याचा प्रयत्न डीएचओ कडून होत आहे.प्रतिक्षा यादीतील दोन उमेदवारांच्या मुलाखती डीएचओ घेणार आहेत.जे की बेकायदेशीर आहे.मुलाखती घेण्याचा अधिकार जिल्हा निवड समितीला आहे.मग हा शहाणपणा करण्याचा सल्ला डॉ अमोल गित्ते यांना कोणी दिला अशी चर्चा सुरू आहे.हा प्रकार म्हणजे लग्न झालं,हनिमून झाला ,गुड न्यूज आली अन पुन्हा त्या मुलीच्या घरच्यांशी बैठक लावून बोलचाली करण्यासारखं आहे.
राज्यात कोणत्याही खात्यात सरळ सेवा भरती करायची असल्यास जिल्हा निवड समितीमार्फत प्रक्रिया राबवली जाते.जाहिरात देणे,अर्ज मागवणे,परीक्षा घेणे अन नंतर मुलाखत घेऊन भरती करणे ही झाली प्रक्रिया.मात्र बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते ही प्रकिया बहुदा मान्य नसावी.
पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी सुभाष सोनवणे या उमेदवाराला नियम डावलून आरोग्य सेवक पदावर थेट नियुक्ती दिली.न्यूज अँड व्युज ने या प्रकरणी बातमी केल्यानंतर जी प सीईओ अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले.प्रतीक्षा यादीतील जास्त गुण असणाऱ्या दोन्ही उमेदवारांना बोलावून घेण्याचे आदेश दिले.त्यानंतर ते रजेवर गेले.
सीईओ रजेवर गेल्याची संधी साधत डीएचओ डॉ गित्ते यांनी प्रतीक्षा यादीतील ताकतोडे आणि मूनवर या दोन्ही उमेदवारांना बोलावून घेत त्यांच्या मुलाखती घेण्याचा घाट घातला आहे.जो की बेकायदेशीर आहे.अशा प्रकारे जिल्हा निवड समितीला अंधारात ठेवून मुलाखती घेण्याचा अधिकार डॉ गित्ते यांना नाहीये.या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत अन सचिव सीईओ आहेत.तरीदेखील डॉ गित्ते यांनी या उमेदवारांना कसकाय बोलावले हा प्रश्न अनुत्तरित आहे.
डॉ गित्ते यांनी बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणात जो घोळ घातला आहे तो पाहता ते यातून सुटण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसत आहे.मात्र ते यात अधिकच गुंतत असल्याचे दिसत आहे.निवड समितीला डावलून नियुक्ती दिली गेली अन आता प्रतीक्षा यादीतील दोन उमेदवारांना बोलावणे पाठवले आहे हा प्रकार म्हणजे लग्न झालं,हनिमून झाला,दोन महिने झाले ,गुड न्यूज देखील आली अन आता मुलीच्या घरच्यांसोबत बैठक बसवण्यासारखे आहे.
या सर्व प्रकरणात सीईओ चा पदभार असणारे अतिरिक्त सीईओ सोळंके हे लक्ष घालणार का,जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे ही नियुक्ती रद्द करणार का? अन बेकायदेशीर नियुक्ती देणारे डॉ गित्ते आणि आरोग्य विभागातील अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.