बीड- मराठवाड्यात नावाजलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत यंदा विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाकडून पारनेरकर महाराज यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत पारनेरकर हे मैदानात उतरणार आहेत.त्या दृष्टीने त्यांनी फिल्डिंग लावली असून मतदार,सभासद आणि हितचिंतक यांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे.
पूर्णवादी बँक म्हणजे वझे आणि पारनेरकर महाराज यांच्या संकल्पनेतून उदयास आलेलं सहकार चळवळीतील एक मोठं नाव.बँक कोतवाल गल्लीत असल्यापासून पारनेरकर महाराज यांच्या शिष्यवर्गाने आपली बँक म्हणून या बँकेवर प्रेम केले.
भविष्यात वझे यांना खड्यासारखं बाजूला केलं गेलं हा भाग वेगळा,पण आज बँकेच्या मराठवड्यातच नव्हे तर राज्यभर शाखा आहेत.अलीकडच्या काळात या बँकेत काही संचालकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे अनेकवेळा समोर आले.गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत बँकेच्या सत्ताधारी मंडळीविरोधात पॅनल उभे राहिले.एवढे झाल्यावर सुद्धा सत्ताधारी मंडळींना लक्षात आले नाही.
दरम्यान विद्यमान संचालक,अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या कारभाराची सखोल माहिती महाराज यांच्यापर्यंत गेल्यानंतर आता थेट पारनेरकर यांच्या कुटुंबाने या बँकेच्या कारभारात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाराज यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी बीड,परळी,परभणी,जालना असा तीन दिवसीय दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी पूर्णवादी बँकेचे संचालक,सभासद,मतदार व्यापारी ,शिष्यगण यांच्याशी संवाद साधला.विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष डॉ अरुण निरंतर यांनी देखील याबाबत सुचक वक्तव्य केले.
त्यामुळे आता पूर्णवादी बँकेच्या कारभारावर दस्तुरखुद्द पारनेरकर परिवाराचे लक्ष असणार आहे,सभासद,शिष्यगण यांची किंमत यामुळे कायम राहील अशी चर्चा होत आहे.