October 5, 2022

एसीएस राठोड यांचे डीमोशन अन बदली !

एसीएस राठोड यांचे डीमोशन अन बदली !

बीड- कोरोनाच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्शन मध्ये केलेला काळाबाजार असो की कंत्राटी पदभरती मध्ये कमावलेले लाखो रुपये अथवा रक्तपेढी विभागातील मनमानी या सगळ्या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड यांना मोठा दणका बसला आहे.राठोड यांचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डीमोशन करत त्यांची उस्मानाबाद येथे बदली करण्यात आली आहे. या कारवाई नंतर तरी डॉ राठोड यांचा माज उतरणार का हे पहावे लागेल.न्यूज अँड व्युज च्या पाठपुराव्याला यश आले असून डॉ जयश्री बांगर आणि गणेश बांगर यांच्यावर सुद्धा लवकरच कारवाई होऊन गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात एसीएस डॉ सुखदेव राठोड,तत्कालीन सीएस डॉ सूर्यकांत गित्ते,रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ जयश्री बांगर,स्टोर किपर अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाय, रियाज,एजाज,ठाकर यांनी मनमानी कारभार केला होता.विशेषतः कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात बांगर अँड कंपनीने शंभर ते दीडशे कोटींच्या पुरवठ्या मधून करोडो रुपये खिशात घातले.

एसीएस डॉ सुखदेव राठोड हे प्रशासन अधिकारी असल्याने नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांची होती.मात्र ज्याच्या हाती तिनोरीच्या चाव्या दिल्या त्यानेच चोरांशी संगनमत केल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला.जिल्ह्यासाठी आलेले 64 हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शन राठोड,बांगर,मुंडे,रियाज यांनी वीस ते चाळीस हजार रुपयांना विक्री करून मड्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार केला.

कोरोनाच्या काळात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोविड सेंटर उभारले गेले.यामध्ये शिपाई ते मेडिकल ऑफिसर ही पदे भरताना डॉ राठोड अँड कंपनीने कोट्यवधी रुपये उकळले. या सगळ्या प्रकाराबाबत न्यूज अँड व्युज ने सातत्याने पाठपुरावा केला.अनेकवेळा या बातम्या न येण्यासाठी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार देखील झाला.

रक्तपेढी प्रमुख डॉ जयश्री बांगर असोत की डॉ सुखदेव राठोड यांनी केलेले कुटाणे न्यूज अँड व्युज ने समोर आणले. आरोग्य सचिव यांच्यापासून ते विद्यमान सीएस यांच्यापर्यंत न्यूज अँड व्युज ने पाठपुरावा केला.डॉ राठोड आणि डॉ जयश्री बांगर यांच्या काळ्या कारनाम्याची चौकशी करण्यासाठी मुंबई ,लातूर, पुणे येथून पथक आले.या पथकांनी दिलेल्या अहवालात डॉ राठोड,डॉ बांगर,डॉ गवते यांच्यासह अनेकजण दोषी आढळून आले.

दरम्यान लातूरचे उपसंचालक बोरसे यांनी डॉ सुखदेव राठोड यांची एसीएस पदावरून वैद्यकीय अधिकारी पदावर पदावनती करून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात बदली केली आहे.डॉ राठोड यांचे डीमोशन झाल्याने ते उस्मानाबाद ला रुजू होणार का हा प्रश्न आहेच पण यापूर्वी चे सीएस डॉ सूर्यकांत गित्ते यांचे देखील डीमोशन करून त्यांनाही वैद्यकीय अधिकारी पदावर जिल्हा रुग्णालयात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु ते आजपर्यंत रुजू झाले नाहीत.

एकीकडे मरणाच्या दारात असणाऱ्या रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसताना काळ्या बाजारात गणेश बांगर,जायभाये,मुंडे यांना हाताशी धरून त्याची विक्री करून डॉ राठोड अँड कंपनीने करोडो रुपये कमावले.दुसरीकडे पदभरती मध्ये पैसे खाल्ले अन पुन्हा सीएस पदासाठी फिल्डिंग लावली गेली.मात्र इथल्या इथंच फेडावे लागतं त्याप्रमाणे डॉ राठोड यांच्यावर कारवाईस सुरवात झाली असून लवकरच ते निलंबित होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click