बीड- नियमबाह्य पध्दतीने नोकरी देण्याचे प्रकरण ताजे असतानाच बीडचे डीएचओ डॉ अमोल गित्ते यांनी मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या करून घोळ घालून ठेवला आहे.डॉ गित्ते यांच्या मनमानी कारभाराला सीईओ पवार का पाठीशी घालत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरू केला आहे.2014 जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील वरच्या दोन उमेदवारांना डावलून कमी गुण असणाऱ्या सोनवणे नामक उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली.
याबाबत न्यूज अँड व्युज ने बातमी दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी डॉ गित्ते यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.या प्रकरणी जास्त गुण असणाऱ्या दोन्ही उमेदवारांना जिल्हा निवड समितीसमोर बोलवण्याचे आदेश दिले.वास्तविक पाहता झालेली नियुक्ती रद्द करून पुन्हा नव्याने प्रक्रिया करणे अपेक्षित आहे.मात्र तरीदेखील थातुरमातुर कारवाई केल्याचे दाखवण्यासाठी ही प्रक्रिया करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
हे प्रकरण ताजे असतानाच डॉ गित्ते यांनी तालुका अंतर्गत आपसी बदल्या करून सीईओ आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे.गणेश घुले,सुहास धाट आणि योगेश जोशी या तिघांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाने बदलाबाबत जो अध्यादेश काढला आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की ,तालुका अंतर्गत आपसी बदल्या अनुज्ञेय असणार नाहीत .मात्र डॉ गित्ते अँड कंपनीने हे आदेश धाब्यावर बसवून बदल्या केल्या आहेत.
डॉ गित्ते यांच्या मनमानी कारभाराला कोणी आवर घालणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.