बीड- नगर पालिका प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत सोमवारी नगर परिषद सभागृहात काढण्यात आली.यामध्ये 26 प्रभाग हे महिलांसाठी राखीव झाले आहेत.त्यामुळे नगर पालिकेत महिलराज येणार आहे.यामध्ये सहा वार्ड हे अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर पालिकेच्या प्रभाग आरक्षणासाठी नगर पालिका सभागृहात बैठक पार पडली.यामध्ये 52 पैकी 26 प्रभाग हे महिलांसाठी राखीव झाले आहेत.यामध्ये 3 प्रभाग हे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असून उर्वरित 23 प्रभागात सर्वसाधारण महिला साठी राखीव झाले आहेत.

26 ठिकाणी महिलराज आणि 26 ठिकाणी सर्वसाधारण पुरुष अशी प्रभाग रचना यावेळी झाली आहे.विशेष म्हणजे एका प्रभागात एक महिला आणि एक।पुरुष असे समीकरण दिसणार आहे.त्यामुळे अनेक भावी नगरसेवकांच्या चेहऱ्यावर यामुळे आनंद दिसून आला आहे.
या प्रभाग रचनेबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी 21 जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.त्यानंतर ही प्रभाग रचना अंतिम केली जाईल.