December 10, 2022

नियम धाब्यावर बसवून नोकरी देणाऱ्यांची चौकशी होणार !

नियम धाब्यावर बसवून नोकरी देणाऱ्यांची चौकशी होणार !

बीड – जिल्हा निवड समिती अर्थात जिल्हाधिकारी यांना अंधारात ठेवून अपंग कोट्यातुन नोकरी देणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे.जीपचे सीईओ अजित पवार यांनी याबाबतची माहिती तातडीने मागवल्याने गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात चार दिवसांपूर्वी 2014 साली प्रतीक्षा यादीत असणाऱ्या सोनवणे नामक उमेदवाराला थेट नियुक्ती देण्यात आली.न्यूज अँड व्युज ने ही माहिती उघड केल्यानंतर जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते आणि त्यांच्या कार्यालयातील प्रशासन अधिकारी सहायक प्रशासन अधिकारी यांनी कमी गुण असलेल्या उमेदवाराला थेट शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत राक्षसभुवन येथे नियुक्ती दिली.हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना डॉ गित्ते अँड कंपनीने थेट नियुक्ती देण्याचा प्रताप केला.

विशेष बाब म्हणजे कोणत्याही सरकारी नोकरीसाठी जिल्हा निवड समिती नियुक्त केलेली असते.मात्र गित्ते आणि इतरांनी जिल्हा निवड समितीला अंधारात ठेवून ही नोकरी दिली.जे उमेदवार गुणानुक्रमे वरच्या स्थानावर होते त्यांना डावलून हा प्रकार केला गेला.या सगळ्याची बातमी न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणली.त्यानंतर अधिकारी वर्गात खळबळ उडाली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी तातडीने आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते यांना या प्रकरणाची फाईल घेवून बोलावले.निवड समिती असो की वरच्या उमेदवारांना का बोलावले नाही?सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना नियुक्ती का दिली गेली?या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत?अशा प्रश्नांचा भडिमार करत सीईओ पवार यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

आपलं उखळ पांढर करण्यासाठी डॉ गित्ते यांनी ज्या पद्धतीने नियम धाब्यावर बसवले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click