बीड – अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान तसेच महिलेच्या मृत्यू प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर मनीषा सानप या आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करताना अति रक्तस्राव होऊन मृत्यू झाला होता.या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात महिलेचा पती गणेश गाडे,सासरा सुंदरराव गाडे ,भाऊ नारायण निंबाळकर आणि मनीषा सानप तसेच सीमा डोंगरे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी सीमा डोंगरे यांनी आत्महत्या केल्यानंतर उर्वरित चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता पती,सासरा आणि भावाला पोलीस कोठडी तर मनीषा सानप या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.