बीड- अवैध गर्भपात केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सिस्टर ने पालीच्या तळ्यात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सीमा डोंगरे या खाजगी रुग्णालयात सिस्टर होत्या अन त्यांनी घरी जाऊन गर्भपात केल्याचे समोर आले होते.
बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करण्यात आला होता.त्यानंतर अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी पोलिसांनी पती,भाऊ यांच्यासह गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टर सह सीमा डोंगरे या सिस्टर वर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पहाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर दुपारच्या सुमारास सीमा डोंगरे यांचा मृतदेह बिंदुसरा धरणात आढळून आला.गर्भपात प्रकरणात त्यांनी गाडे या महिलेच्या घरी जाऊन गोठ्यात गर्भपात केला होता.त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय आहे.