बीड- चौसाळा येथील भीमाशंकर शुगर मिल चे चेअरमन नितीन लोढा यांच्यावर त्यांच्याच कार्यकर्त्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये लोढा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.
सोमवारी रात्री नितीन लोढा हे नातेवाईकाच्या लग्नसमारंभाहून घरी आले.साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना रणजित गुंजाळ याने फोन करून भेटण्यासाठी गेला.लोढा घरातून बाहेर आल्यानंतर गुंजाळ याने बोलता बोलता नितीन यांच्यावर कोयत्याने वार केले.डोक्याला अन चेहऱ्यावर वार झाल्याने लोढा खाली कोसळले.
गोंधळ ऐकून घरचे लोक,शेजारी धावून आले,त्यावेळी गुंजाळ याने दुचाकी तेथेच सोडून पलायन केले.आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून चोप दिला.जखमी अवस्थेतील लोढा यांना बीडच्या फिनिक्स हॉस्पिटलमध्ये आणि नंतर औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या हल्ल्यात लोढा गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे.हा हल्ला का झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत.