July 7, 2022

गर्भवती महिलेचा मृत्यू ! अवैध गर्भपाताचा संशय !!

गर्भवती महिलेचा मृत्यू ! अवैध गर्भपाताचा संशय !!

बीड- गेल्या दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यात कमी झालेले अवैध गर्भपाताचे आणि गर्भलिंग निदान चे रॅकेट पुन्हा डोके वर काढू लागले आहे.अवैध गर्भपात करताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मृत झालेली ही महिला माजलगाव तालुक्यातील आहे.

बीड जिल्ह्यात परळीच्या डॉ सुदाम मुंडे (dr.sudam munde) आणि बीडच्या डॉ शिवाजी सानप(dr shivaji sanap) यांच्यासारख्या राक्षसी प्रवृत्तीच्या डॉक्टर मंडळीमुळे मोठ्या प्रमाणात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात (pcpndt) झाल्याचे काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते.परळीत तर गर्भपात झाल्यानंतर निघणारे गर्भ कुत्र्यांना खाऊ घालण्याचा प्रकार समोर आला होता.तर बीडमध्ये गर्भपात केल्यानंतर निघणारे भ्रूण हे नदीपात्रात फेकुन देण्याचा प्रकार समोर आला होता.या सह अनेक डॉक्टर मंडळींवर या प्रकरणात कारवाई झाल्यानंतर अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान याला काहीसा आळा बसला होता.मात्र हे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे दिसू लागले आहे.

माजलगाव तालुक्यातील बक्करवाडी येथील शीतल गाडे या महिलेला जिल्हा रुग्णालयात दुपारी आणले असता ती मृत असल्याचे आढळून आले.मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता डॉक्टर मंडळींनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणात माहिती घेतली असता शीतल गाडे या महिलेला अगोदरच तीन मुली आहेत.ती चौथ्यांदा गर्भवती राहिल्याने तिच्या घरच्यांनी गर्भलिंग निदान केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन चौथ्यांदा देखील मुलगीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिचा खाजगी डॉक्टर कडे किंवा घरीच गर्भपात करण्याचा प्रयत्न झाला असण्याची शक्यता आहे. टीक्त तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात मृत अवस्थेत आणून दाखल केले.

शीतल गाडे हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा ती मृत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान हा सगळाच प्रकार गंभीर असून शीतल चा मृत्यू नेमका कशामुळे झाला,तिने गर्भलिंग निदान करून घेतले होते का?अवैध गर्भपात घरी केला गेला की खाजगी डॉक्टर कडे याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click