अंबाजोगाई- प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षा आणि इनोव्हा गाडी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर सात जण जखमी झाले.मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.
केज अंबाजोगाई महामार्गावर होळ गावानजीक एम एच 16,सी इन 700 या इनोव्हा गाडीला समोरून येणाऱ्या एम एच 23 एक्स 522 या रिक्षाने जोराची धडक दिली.अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला.रिक्षात बसलेले मच्छीन्द्र बोके आणि बालाजी मुंडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन लहान बालकांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. अपघातामध्ये सात प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत.