November 26, 2022

गुट्टे यांच्यासह चार कर्मचारी निलंबित !

गुट्टे यांच्यासह चार कर्मचारी निलंबित !

बीड-दिन दिवसांपूर्वी परभणी येथे बदली झालेले बीड नगर पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.विधिमंडळात लक्षवेधी सुचनेसाठी माहिती न देता निघून आल्याप्रकरणी या पाच जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

बीड नगर पालिकेत रुजू झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणाने वादात अडकलेले मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या विरोधात आ विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.या बाबत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कक्षात मुख्याधिकारी गुट्टे यांच्यासह काही कर्मचारी यांना बोलावण्यात आले होते.

गुट्टे हे तेथे हजर होते,मात्र दुसऱ्या दिवशी यांच्यासह सर्वच कर्मचारी गैरहजर राहिले.त्यामुळे त्यांच्या निलंबनाची घोषणा तनपुरे यांनी सभागृहात केली होती.दरम्यान त्यानंतर गुट्टे आणि इतर कर्मचारी बीड येथे कामकाज पाहत होते.दोनच दिवसांपूर्वी गुट्टे यांची परभणी येथे उपायुक्त म्हणून बदली झाली.

दरम्यान बुधवारी मुख्याधिकारी गुट्टे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राहुल टाळके,सहायक कर अधिक्षक सुधीर जाधव,बांधकाम अभियंता योगेश हाडे आणि ट्रेसर सलीम सय्यद याकूब या पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click