January 30, 2023

रुग्णसेवा सुरळीत होणार ! परीचरिकांचा संप मागे !!

रुग्णसेवा सुरळीत होणार ! परीचरिकांचा संप मागे !!

मुंबई – राज्यभरातील हजारो परिचारिकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 23 मे पासून संप पुकारला होता. आज झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला. आजच्या बैठकीमध्ये मुख्य मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

आरोग्य सेवेत परिचारिकांची नियमित भरती करण्यात यावी.जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.केंद्र सरकार प्रमाणेच नर्सिंग भत्ता देण्यात यावा.आरोग्य सेवेचे खाजगीकरण करु नये.प्रशासकीय बदली रद्द करुन विनंती बद्दली करण्यात यावी आदि मागण्यांसाठी संप सुरू होता.


विविध मागण्यांसाठी राज्य परिचारिका संघटनांनी राज्यात अनेक ठिकाणी संप पुकारला होता. त्यावर राजेश टोपे म्हणाले, परिचारिका संपावर आहे. आयुक्त आणि उपायुक्त यांच्याशी मी लगेचच बोलणार आहे. संप सोडवण्यासाठी प्रयत्न करू. त्यांच्या रास्त मागण्यांचा आम्ही विचार करू आणि मागण्या मान्य करु असे टोपे म्हणाले.

राज्यात 23 ते 25 मे दरम्यान परिचारिकांकडून शांततापूर्ण आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली. याची दखल न घेतल्यामुळे 26 ते 27 मे 2022 पर्यंत राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरु करण्यात आलं.त्यानंतर राज्य सरकारने चर्चेसाठी वेळ न दिल्याने संपूर्ण राज्यात 28 मे 2022 पासून अनिश्चितकालीन संप सुरु करण्यात आला होता. आज हा संप अखेर मागे घेण्यात आला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click