बीड – बीड परळी महामार्गावर जरूड फाट्यानजीक दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला.यामध्ये दोघेही जागीच ठार झाल्याची घटना घडली.या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
वडवणी येथील महावितरण कार्यालयात ऑपरेटर असलेले नरेंद्र जोशी हे आपल्या दुचाकीवरून कामावर निघाले होते.जरुड फाट्यानजीक समोर येणाऱ्या सुभाष राठोड यांच्या वाहनाची जोरात धडक झाली. त्यावेळी दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
अपघात एवढा भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला.यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.रस्त्याच्या कडेला असलेले साईड पंखे न भरल्याने या महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत,याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.