December 10, 2022

तालखेड मध्ये गोळीबार !

तालखेड मध्ये गोळीबार !

माजलगाव – तालुक्यातील तालखेड येथे ग्रामस्थांना मारहाण करून गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.यानंतर ग्रामस्थांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.

माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे काही युवक रस्त्यावर येऊन थांबले असताना जीपमधून आलेल्या संतोष गायकवाड व इतर तीन ते चार जणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जीपमधील एका व्यक्तीने या युवकांवर गोळीबार केला. यामध्ये साहेबराव जाधव हे जखमी झाले.यानंतर हे लोक जीपमधून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ही जीप अडवून जीपमधील लोकांना बेदम चोप दिला.याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारे लोक हे गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click