बीड- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यावर टीका केलीय.वारसा हक्काने कारखाना मिळाला ते गडगंज झाले मात्र संस्था उध्वस्त झाली,या लोकांना झोप तरी कशी येते अशी टीका त्यांनी केली.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम समाप्ती कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,ज्यांना वारसा हक्काने कारखाना मिळाला, ते स्वतः गडगंज झाले. संस्था मात्र उध्वस्त केली. आज 1 हजार कोटींचा भगदाड वैद्यनाथ कारखान्याला पडलेय. त्यांना कारखाना चालवता येत नाही; असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडेंवर नाव न घेता टीका केली. त्याचबरोबर ऊसाचा हप्ता केवळ दीड हजार रुपये एफआरपीप्रमाणे काढलाय. आम्ही किरायाने कारखाना घेऊन 2 हजार रुपये दिला. मग वरचे 500 रुपये यांना येणाऱ्या निवडणुकीत वापरायचे आहेत का? असा सवाल देखील त्यांनी केला
मी जो कारखाना चालवायला घेतला. तो पैसे कमावण्यासाठी घेतला नाही. तर जिल्ह्यात अतिरिक्त ऊस उभा राहू नये, म्हणून या शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. त्यामुळेच या कारखान्याने या हंगामात 2 लाख 18 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मात्र ज्यांना कारखाना वारसाने मिळाला, कारखान्याला प्रभू वैद्यनाथाचे नाव आहे. त्या कारखान्याला आज एक हजार कोटींचा भगदाड पडले आहे. तुम्ही आशीर्वाद द्या, वैद्यनाथ कारखाना देखील चांगला उभा करतो; असं म्हणत थेट बहीण पंकजा मुंडे यांना देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले आहे.
तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकत नाहीत, अन् तुम्हाला कशी झोप येते? ते कळत नाही. आम्ही वैद्यनाथला पैसे कमवायचे म्हणून ऊस घातला नाही. तर वैद्यनाथ कारखान्याचे सभासद पद टिकवायचे आहे म्हणून घातलाय. गेल्या वर्षी तर माझा फॉर्म सुद्धा वगळला. असा आरोप देखील यावेळी धनंजय मुंडेंनी केला. तुम्ही लोकांना 1500 हजारांनी पैसे दिले. आम्ही 2000 हजारांनी पैसे दिले आहेत. मग 500 रुपये कशासाठी ठेवले आहेत? असा सवाल करत येणाऱ्या निवडणुकीसाठी ठेवले असतील. असा टोला देखील यावेळी मुंडे यांनी लगावला आहे.