August 16, 2022

कलेक्टर अन एसपी आमदारांनी उपोषण करण्याची वाट बघत होते का ?

कलेक्टर अन एसपी आमदारांनी उपोषण करण्याची वाट बघत होते का ?

बीड- बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर अनधिकृत अन अधिकृत वाळू उपसा सुरू आहे.सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत,वाळू माफिया मोकाट आहेत या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना माहीतच नव्हत्या का?प्रशासन इतक्या दिवस झोपा काढत होतं का?आमदार कधी उपोषण करतात अन आपण कधी वाळू कंत्राटदार यांची बैठक घेतो याची वाट पाहत होते का?असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेवराई तालुक्यातील वाळू माफियांना आवर घालावा, सहाशे रुपये ब्रास ची वाळू सहा हजार रुपये ब्रास ने विक्री बंद करावी,जेसीबी,पोकलेन,केन्या बोटीने होणारा वाळू उपसा बंद करावा,भ्रष्ट महसूल आणि पोलीस प्रशासनावर करावी करावी या मागण्यांसाठी गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

हे उपोषण सुरू होताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.उपोषण करू नये म्हणून प्रशासनाने आमदारांना विनंती केली.उपोषण सुरू झाल्यावर गेवराई तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, एसपी या सगळ्यांना बोलावून घेत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बैठक घेतली.

या बैठकीत अनेक निर्णय जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले,मात्र त्याचे पालन किती होईल हे प्रशासनालाच माहीत. दहा पंधरा दिवस वाळू उपश्याचे राहिले आहेत.प्रशासकीय पद्धतीनुसार समिती गठीत होणार,ती जाऊन पाहणी करणार,त्यानंतर अहवाल देणार अन मग कारवाईला सुरुवात होणार.तोपर्यंत वाळू उपशाची तारीख निघून जाणार,प्रशासनाच्या हाती धुपाटने येणार अशी अवस्था आज तरी दिसते आहे.

गेल्या एक दीड महिन्यापासून अधिकृत वाळू टेंडर सुरू आहेत,तर बारा महिने अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे.मग ही गोष्ट तहसीलदार, पोलीस आणि जिल्हाधिकारी यांना माहीत नव्हती का?आमदाराने उपोषण केल्यावरच कारवाई करायची अस ठरलं होतं का?जर एखाद्या प्रश्नावर आमदाराला उपोषण करावे लागत असेल तर जिल्ह्यात सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार?सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षाच करायची नाही का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click