बीड (प्रतिनिधी) शहरातील मॉ वैष्णो पॅलेस येथे 23 मे रोजी झालेल्या जुळून येती रेशीम गाठी या उपक्रमांतर्गत झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात एचआयव्ही संसर्गित सात जोडपे विवाहबध्द झाले.
या सोहळ्यास वर्हाडी मंडळींनी मोठी गर्दी केली होती. बीड जिल्हा व्यापारी महासंघ (कॅट) सह एचसीसीपी प्लस, एनएमपी प्लस, बीड जिल्हा व्यापारी महासंघ (कॅट), बीड जिल्हा पोलिस प्रशासन, विहान प्रकल्प, माँ वैष्णो पॅलेस ग्रुप बीड, बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटंट व ट्रॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, राजस्थानी सेवा समाज, बीड जिल्हा अन्न व औषध प्रशासन यांच्या पुढाकारातून हा नेत्रदीपक सोहळा पार पडला.
एचआयव्हीसह जगणार्या सात जोडप्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे ठरवले आहे. एकमेकांच्या मदतीने आपल्याला झालेल्या दुर्धर आजारावर त्यांनी मात करण्याचा निर्धार केला आहे. विहानच्या वतीने जुळून येती रेशीम गाठी हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो. मात्र यावर्षी बीड जिल्हा व्यापारी महासंघ (कॅट)चे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी कार्याध्यक्ष विनोद पिंगळे यांच्या पुढाकारातून हा सोहळा न भूतो न भविष्यती असा झाला. 23 ने रोजी मॉ वैष्णो पॅलेस येथे सायंकाळी सात वाजता विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमास हभप महादेव महाराज चाकरवाडीकर,सीईओ अजित पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हाकिारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर.आर.तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, प्रशासकीय मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे, पोलिस उपाधीक्षक संतोष वाकळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जयवंत मोरे, विहानचे कार्यक्रमाधिकारी विनोद जांभळे, माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, करसल्लागार सत्यनारायण लोहिया, अॅग्रो इनपुटचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, कुटे ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कुटे, कुटे ग्रुपच्या एमडी अर्चना कुटे, जिल्हा केमिस्ट डग्रिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण बरकसे, सत्यनारायण कासट, अॅग्रो इनपुटचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री आदी उपस्थित होते. कार्यक्रमात पोलिस प्रशासनाच्या वतीने सातही वधुवरांना मनी-मंगळसुत्र देण्यात आले तर उपस्थित अधिकारी, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी वधुवरांच्या मागे मामा म्हणून उभे राहिले. सोहळ्यास विहान परिवाराचे स्मिता कुलकर्णी, शेख दादामियाँ, रामेश्वर जगरवाल, शिनु उजगरे, शितल गोचंडे, मोसमी शिंदे, मनीषा मगर, किरण वंजारे, विजय भद्रे, पंकज धुत, वंदना हिरे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नैत्रदीपक अशा विवाह सोहळ्याचे बहादार सुत्रसंचालन गिरीष सोहनी, सुरेश साळुंके यांनी तर भरत लोळगे यांनी मंगलाष्टक सादर करुन मांगल्य निर्माण केले. पोलिस बॅण्ड पथकाने राष्ट्रभक्तीपर गिते वाजवून वातावरण निर्मिती केली.
या विवाह सोहळ्यातील वधुंना अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या सहकार्यातून मंगळसुत्राची तर लल्लू मरलेचा यांनी चैन व जोडवे भेट दिले. चप्पल व बुटाची व्यवस्था व्यापारी लईक अहेमद यांनी केली. कॉट व कपाटासाठी संतोष अब्बड, संजय साळुंके यांनी मदतीचा हात पुढे केला. वधुवरांना भांड्यासाठी मनमोहन कलंत्री, अजित कांकरीया, ओम बियाणी, नंदू बियाणी यांनी सहकार्य केले. व्यापारी महासंघाच्या वतीने कुकर, मिक्सर, रॅक, कपडे, साड्या आदी साहित्य देण्यात आले.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी यांच्यासह अंगद नवले, अभिषेक चरखा, गजानन चरखा, कमलेश रांदड, पंकज भुतडा, मयुर कासट, गोविंद मुंदडा यांनी मॉ वैष्णो देवी मंगल कार्यालय उपलब्ध करुन दिले. भोजनाची व्यवस्था हरिओम धुप्पड, अरुण बरकसे, नितीन खोड, प्रशांत बुंदिले, गांधी यांनी सहकार्य केले.