August 16, 2022

आमदार उपोषणात अन प्रशासन वाळू माफियांच्या दारात !

आमदार उपोषणात अन प्रशासन वाळू माफियांच्या दारात !

बीड- गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून वाळूचा बेसुमार उपसा चालू आहे.शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून सुरू असलेल्या वाळू उपशावर बंदी घालावी,महसूल अन पोलीस प्रशासनातील हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भाजपचे आ लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

गेवराई तालुक्यातील ज्या वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत तेथून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीने वाळू उपसा सुरू आहे.सहा हजार ब्रास वाळू उपशाची परवानगी असताना चाळीस पन्नास हजार ब्रास चा उपसा केला जात आहे.वाहतूक करणाऱ्या वाहनावर जीपीएस सिस्टीम लावलेली नाही.तहसीलदार असोत की डीवायएसपी सगळेच हप्तेखोरी करत असल्याने वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे.

या सगळ्या कारणावरून भाजपचे गेवराईचे आ लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.जे लोक हप्ते देतात त्यांच्यावर महसूल आणि पोलीस कधीच कारवाई करत नाहीत असा आरोप करत आ पवार यांनी वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली आहे.

पुर्वी वाळूची अपसेट किंमत सहा हजार रुपये ब्रास होती. त्यामुळे लोकांना अधिक भावाने वाळू घ्यावी लागे. आता वाळूची प्रतिब्रास अपसेट किंमत हजारांहून ६०० रुपये झाली. वाळू घाटांचे लिलावही काही महिन्यांपूर्वी झाले. मात्र, लोकांना आजही पाच हजार रुपये ब्रासपेक्षा अधिक भावाने वाळू घ्यावी लागते. तीन ब्रासपेक्षा अधिक वाळू वाहनात भरण्याच्या नियमालाही फाटा दिला आहे. या विरोधात भाजपचे गेवराई मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह उपोषणाला सुरुवात केली आहे. लिलावात १६ हजार ब्रास वाळू उत्खननाची परवानगी होती. मात्र, पहिल्या पाच दिवसांतच ठेकेदारांनी हे उत्खनन केले.

आता तीन महिने चालणारे वाळू उत्खनन अवैध असल्याचा आरोपही त्यांनी केला. सीसीटीव्ही लावावेत, वाहनांना जीपीएस प्रणावी लावावी, सामान्यांना कमी भावाने वाळू मिळावी, आदी मागण्या लक्ष्मण पवार यांनी केल्या. दरम्यान, गेवराईत महसूल व पोलिस प्रशासनात येणारे अधिकारी केवळ वाळूवरील मलिदा खाण्यासाठीच येतात, त्यांना अवैध वाळू उपशाचे काही देणे – घेणे नाही, तक्रारी करुनही काही होत नाही. फक्त ज्यांच्याकडून हप्ते नाहीत अशांवरच कारवाया होतात असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click