बीड – राष्ट्रीय कार्य म्हणून रक्तदान करून रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या रक्तदात्यांच्या नावावर येत असलेले अनुदान डॉ जयश्री बांगर अन रक्तपेढीमधील कर्मचाऱ्यांनी हडप केल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. याबाबत न्यूज अँड व्युज ने आवाज उठवला होता,मात्र असे काही अनुदान येतच नाही असा दिखावा बांगर अँड कंपनीने उभा केला होता.मात्र आरोग्य विभागाच्या अहवालामुळे त्यांचा बुरखा टराटरा फाटला आहे.
राष्ट्रीय राज्यसंक्रमण परिषदेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी विभाग उभारण्यात आला आहे.विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था राजकीय पक्ष,वैयक्तिक कोणीही रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करू शकते आणि राष्ट्रीय कार्यास हातभार लावू शकतो असा यामागचा उद्देश आहे.
मात्र या चांगल्या उद्देशाला हरताळ फसण्याचा प्रकार बीडमध्ये डॉ जयश्री बांगर,डॉ रेश्मा मोकाशे गवते,डॉ सुखदेव राठोड यांनी केल्याचे न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणले. कोणत्याही रक्तदात्याने वैयक्तिक किंवा सामाजिक संस्थेने रक्तदान शिबीर आयोजित केल्यास प्रत्येक रक्तदात्याला वीस रुपये अनुदान राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेकडून दिले जाते.
मात्र 2013 ते 2019 या काळात रक्तपेढी प्रमुख असलेल्या डॉ बांगर आणि त्यांच्या कंपूने हे अनुदान लाभार्थ्यांना न देता स्वतःच हडप केले.यामध्ये एसीएस राठोड,बांगर,गवते,डॉ एस बी कदम,आशा केकान,गालफाडे,आर एस खेडकर,महादेव येवले यांच्यासह इतरांचा सहभाग आहे.या सगळ्या लोकांनी लाखो रुपयांचे अनुदान परस्पर हडप केले.याबाबत न्यूज अँड व्युज ने सत्य समोर मांडले होते.
आरोग्य विभागाच्या अहवालात आता ही गोष्ट नमूद करून यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आल्याने आमच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.आता या अनुदानाची रक्कम वसूल करून अपहार करणाऱ्या डॉ बांगर अँड कंपनीवर गुन्हे कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.