बीड- रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पाठलाग करत एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना बीड नजीक घडली.बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा थरार घडल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात घडणारे बलात्कार आणि खुनाचे सत्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बीड तालुक्यातील मंझरी येथील सिद्धेश्वर बहिरवाळ याच्या बहिणीशी गावातीलच ब्रम्हदेव कदम याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.या कारणावरून दोघात यापूर्वी अनेकदा वाद अन भांडण देखील झाले होते.
रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर याने ब्रम्हदेव याला फोन करून तो जेवत असलेल्या धाब्यावर गेला.त्यानंतर त्याचे अन्य दोन साथीदार तेथे आले.चौघे परत गावाकडे निघाले,यावेळी दुचाकी चालवणाऱ्या ब्रम्हदेव याच्यावर सिद्धेश्वर ने पाठीमागून चाकूने सपासप वार केले.ब्रम्हदेव हा रक्ताच्या थारोळ्यात पडला त्यावेळी त्याच्यावर वार करणारा सिद्धेश्वर हा फरार झाला.सोबतच्या दोन मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत तो मृत झाला होता.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.