बीड- मराठवाड्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी यांच्या उत्कर्ष पॅनेलने दणदणीत विजय मिळवला.मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती यामध्ये उत्कर्ष पॅनलचे जवळपास 16 उमेदवार विजयी झाले,उर्वरित चार जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी विरुद्ध माजी पदाधिकारी यांच्यात लढत होती.माजी कार्यवाह सतीश पत्की यांनी स्वतंत्र पॅनल उभा केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते तर हितचिंतक मतदार संघात तीन उमेदवार विजयी झाले.यामध्ये पत्रकार राम कुलकर्णी यांचा समावेश आहे.पत्की यांच्या पॅनलचा केवळ एक उमेदवार विजय मिळवू शकला.सर्वसाधारण मतदारसंघात उत्कर्ष पॅनलचे सर्वच्या सर्व अकरा उमेदवार मोठी आघाडी घेऊन विजयी झाले.
सुरेंद्र आलूरकर,माणिक भोसले,कल्पना चौसाळकर,विजय चाटूफळे, प्रकाश दुगड, अमरनाथ खुर्पे, विष्णू कुलकर्णी, सत्यनारायण लोहिया,शंकरराव लासुने,ज्योती ठाकूर,डॉ हेमंत वैद्य हे अकरा संचालक सर्वसाधारण मतदारसंघातुन विजयी झाले आहेत.