October 5, 2022

रक्तपेढीतील गैरव्यवहाराला डॉ राठोड जबाबदार !

रक्तपेढीतील गैरव्यवहाराला डॉ राठोड जबाबदार !

बीड – जिल्हा रुग्णालयात प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड यांनीच कर्तव्यात कसूर केल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. रक्तपेढी प्रमुख डॉ जयश्री बांगर,डॉ रेश्मा मोकाशे गवते यांच्या कारभारावर डॉ राठोड यांनी नियंत्रण न ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डॉ जयश्री बांगर आणि गणेश बांगर या बहीण भावाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणले होते.यादोन्ही बहीण भावाना त्या त्या वेळच्या प्रत्येक जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पाठीशी घातले.

मात्र लातूरच्या उपसंचालक कार्यालय आणि मुंबई च्या संचालक कार्यालयाने केलेल्या चौकशीत बीडच्या रक्तपेढीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले आहे.जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड यांनी निष्काळजीपणा व अकार्यक्षम कारभार केल्याचा ठपका समितीने अहवालात नमूद केला आहे.

ज्या डॉ राठोड यांच्यावर कारभार सुरळीत ठेवण्याची जबाबदारी होती त्यांनीच मनमानी कारभार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.रक्तपेढी विभाग असो की विषाणू संसर्ग प्रयोग शाळेतील खरेदी,प्रत्येक व्यवहारात डॉ राठोड,डॉ बांगर आणि डॉ गवते यांनी टक्केवारी घेऊन काम मंजूर केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डॉ जयश्री बांगर आणि गणेश बांगर या बहीण भावाने जो नंगानाच या दोन तीन वर्षात केला आहे त्याची चौकशी सुरू झाली असून या दोघांसह सर्वच दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी न्यूज अँड व्युज सातत्याने पाठपुरावा करत राहील हे नक्की .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click