अंबाजोगाई – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनुभाऊ तुम्ही तब्बल सतरा कोटी रुपये खर्चून अंबाजोगाईत एस आर टी रुग्णालयासाठी एमआरआय मशीन मागवली,मात्र सहा महिने झाले तरी एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन न जोडल्याने कोट्यवधींची मशीन धूळखात पडून आहे.धनुभाऊ आता एकदा या मुजोर अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा अन रुग्णसेवेत ही मशीन उपलब्ध करा.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन अडीच वर्षात जिल्ह्यासाठी अब्जावधी रुपये निधी खेचून आणला.पण प्रशासनात बसलेल्या झारीतील शुक्राचार्य मुळे विकास कामे अडली आहेत.
कोरोनाच्या काळात अंबाजोगाईत एस आर टी रुग्णालयासाठी तब्बल सतरा कोटी रुपयांची फिलिप्स कंपनीची एमआरआय मशीन मुंडे यांनी खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले.डिसेंम्बर महिन्यात ही मशीन रुग्णालयात आली देखील.पण महावितरण च्या अधिकाऱ्यांना टक्केवारी न मिळाल्याने त्यांनी अकरा केवही ची विजजोडणीचे काम अद्याप केलेलं नाही.
सहा महिने होत आले तरीदेखील महावितरण चे अधिकारी यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे विजजोडणीचे काम झालेले नाही.त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन एमआरआय करावा लागत आहे.केवळ टक्केवारी साठी विजजोडणीचे काम रोखणाऱ्या अधिकाऱ्यांना घराचा रस्ता दाखवून धनुभाऊ तुम्ही तातडीने विजजोडणीचे काम व्हावे यासाठी प्रयत्न करा.