बीड – कोणी उपजिल्हाप्रमुख तर कोणी नगरसेवक तर कोणाची आई नगरसेवक अशा राजकीय पदाधिकारी असलेल्या खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसच हे प्रकरण बाहेरच मिटावे यासाठी वाट पाहत असल्याचे चित्र आहे.राजकीय पदाधिकारी असणाऱ्या खाजगी सावकारांच्या पोलीस मुसक्या आवळणार का हाच खरा प्रश्न आहे.
पंकज बबनराव काळे (21) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बबनराव काळे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत देण्यासाठी खासगी सावकारांनी तगादा लावून धमकी दिली,अपमान केला. यामुळे मुलगा पंकज याने 1 मे रोजी राहत्या घराच्या दुसर्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीच्या अॅगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
या प्रकरणी खासगी सावकार किशोर पिंगळे, रणजीत पिंगळे, राजकुमार गुरखुदे, हनुमान उर्फ बंडू पिंगळे, आशिष सोनी यांच्याविरोधात शहर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे हे करत आहेत.
बीडमध्ये शिवसेना असो की राष्ट्रवादी अथवा भाजप सगळ्या पक्षात काम करणारे लोक हे खाजगी सावकारकी करतात.काहीजण अर्बन निधीच्या नावाखाली तर काहीजण वडापाव विकण्याच्या नावाखाली अन काहीजण खुलेआमपणे लोकांना रोजाने पैसे देतात.त्यांच्याकडून लाखाचे दहा लाख कमावतात.हे सगळं बीडच्या एसपी पासून ते साध्या कॉन्स्टेबल पर्यंत सगळ्यांना माहीत आहे.मात्र ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्यालामीळत असल्याने या खाजगी सवकारांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.