August 16, 2022

माजी आमदार पुत्रासाठी कायद्याची पायमल्ली !

माजी आमदार पुत्रासाठी कायद्याची पायमल्ली !

बीड- बीडचे माजी आमदार सय्यद सलीम यांच्या वाळूचा ठेकेदार असलेल्या मुलांसाठी कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.महसूल प्रशासन आणि मंत्र्यांना हाताशी धरून सलीम यांनी आपल्या मुलाचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे.

बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदाकाठ हा जिल्ह्यातील राजकीय पुढारी,महसूल चे अधिकारी,पोलीस अधिकारी यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.युध्दाजित पंडित असोत की विजयसिंह पंडित अथवा शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसचे पुढारी हे वाळूच्या काळ्या धंद्यात आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.

दरवर्षी वाळू उपश्याच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल या ठिकाणी हे पुढारी करतात.नियम,कायदे हे शब्द गेवराईत चालत नाहीत.आता या धंद्यात बीडचे माजी आ सय्यद सलीम यांनी देखील उडी घेतली आहे.

सय्यद सलीम यांचा मुलगा सय्यद अन्वर याच्या नावाने मागील वर्षी राक्षसभुवन येथील वाळू घाट मंजूर झाला.गेल्या वर्षी सलीम यांच्यासोबत युध्दाजित पंडित,अनिल जगताप यांच्यासह अनेकांनी हजारो ब्रास वाळू या ठिकाणाहून उचलत कोट्यवधी रुपये कमावले.

मात्र माजी आ सय्यद सलीम यांनी आपले मंत्रालयातील वजन वापरून आपल्या मुलाच्या वाळू ठेक्याला मुदतवाढ मिळावी किंवा दुसऱ्या ठिकाणाहून वाळू उपसा करण्यासाठी खटाटोप सुरू केला.गेल्या काही महिन्यात त्यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सेटिंग लावण्यासाठी धडपड केली.

तहसीलदार असोत की तलाठी अथवा उपविभागीय अधिकारी या सगळ्यांना मॅनेज करत गतवर्षी राक्षसभुवन येथून 16570 ब्रास वाळू उपसा करता न आल्याचा अहवाल तयार केला.या अहवालावर राज्यमंत्री सत्तार यांच्याकडे सुनावणी घेतली अन राक्षसभुवन ऐवजी या वाळू ठेकेदाराला म्हणजे सलीम यांच्या मुलाला सावरगाव येथून वाळू उपसा करण्याची ऑर्डर काढून घेतली.

वास्तविक पाहता अशा पध्दतीने एखादया ठेकेदाराला दुसरीकडे वाळू उपसा करण्याची परवानगी देता येत नाही,मात्र माजी का सय्यद सलीम यांनी आपल्या लेकरांसाठी नियम पायदळी तुडवले अन वाळू माफियांच्या गॅंग मध्ये सहभागी झाले.जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click