लातूर – कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच ऊसतोड कामगार महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात घडली.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम येथील रहिवासी आहेत.
राधाबाई आडे,काजल आडे आणि दीक्षा आडे या तीन मायलेकी आपल्या काही सहकारी महिलांसोबत कपडे धुण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे असलेल्या तलावाववर गेल्या होत्या.कपडे धुताना आडे माय लेकिसह सुषमा राठोड आणि अरुणा राठोड या दोघी पाण्यात बुडाल्या.
दीक्षा पाण्यात पडल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात इतर चार जणी देखील पाण्यात बुडाल्या.ही घटना सोबत असलेल्या एका दहा वर्षीय मुलाने पाहिल्याने त्याने ग्रामस्थांना बोलावून घेतले.पाचही महिलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
या घटनेमुळे अहमदपूर सह पालम तालुक्यात शोककळा पसरली आहे.