बीड – काकू -नाना प्रतिष्ठान, पतंजली योग समिती बीड व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने 365दिवसांचे योग प्राणायाम शिबीर. 21जून जागतिक योग दिनानिमित्त काकू -नाना प्रतिष्ठान व पतंजली योग समिती गेल्या 8वर्षांपासून बीड शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून योग दिंडी आपल्या दारी हे अभियान राबवत आहे.
मागच्या दोन वर्षात कोरोना मुळे योग अभियान ऑनलाईन घेण्यात आले. पण या वर्षी सगळीकडे सूट मिळाल्या मुळे परत एकदा दि.22जून 2021ते 21जून 2022असं 365 दिवसांचे योग शिबीर बीड वासियांसाठी सुरु आहे.. या योग शिबिरात प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून हरिद्वार प्रशिक्षित नामांकित योग शिक्षक येतात तसेच महाराष्ट्रातून व विविध प्रांतातून वेगवेगळे प्रशिक्षक येत आहे.
“बीड शहरातील प्रत्येक प्रभागासाठी ……
प्रभागातील प्रत्येकासाठी, योग दिंडी आपल्या दारी.
प्रभागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक प्रभागात 10दिवसांचे योग प्राणायाम शिबीर सुरु झालेले आहे. सध्या हे योग शिबीर चंपावती प्राथमिक शाळेच्या मैदानावर दि.9मे ते दि.18मे 2022पर्यंत आहे. या पुढील शिबीर छत्रपती संभाजी राजे क्रिडांगण येथे दि.19मे 2022ते 29मे 2022या कालावधीत सुरु होणार आहे याचा लाभ बीड शहरातील नागरिकांनी जास्तजास्त संख्येने घ्यावा असे आव्हान काकू नाना प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व पतंजली चे ऍड. श्रीराम लाखे यांनी केले आहे.