September 30, 2022

बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू !

बापलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू !

परळी – शहरातील बरकत नगर भागातील शेख सादिक हे दादाहरी वडगाव येथील विहिरीत बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी गेलेला मुलगा शेख रफिक याने प्रयत्न केले.या घटनेत दोघेही बापलेक बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शेख सादिक हे त्यांच्या नातेवाईकांसोबत दादाहरी वडगाव येथे फिरण्यासाठी गेले होते.यावेळी विहिरीवरून पाणी काढत असताना पाय घसरून ते विहिरीत पडले.त्यांना वाचविण्यासाठी 25 वर्षीय मुलगा रफिक याने उडी घेतली.मात्र दोघेही पाण्यात बुडाले.

हे दोघे बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसरा मुलगा शेख साजिद हा विहिरीत उतरला.मात्र तो देखील बुडायला लागल्याने त्याच्या आईने दोरी टाकून त्याला वाचवले.मात्र पती सादिक आणि मुलगा रफिक या दोघांना वाचविण्यात त्यांना अपयश आले.

घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली.या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click