गंगाखेड – एकीकडे बीड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पुढाऱ्यांच्या सहकार्याने वाळू माफियांनी हैदोस घातला असताना दुसरीकडे बीडचे सुपुत्र तथा गंगाखेड चे पोलोस उपाधीक्षक श्रेणीक लोढा यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत.तब्बल 98 वाळू माफियांवर गुन्हे दाखल करत लोढा यांनी 38 आरोपी ताब्यात घेतले आहेत.या कारवाईत पोलिसांनी साडेसात कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परभणी जिल्ह्यात वाळू माफियांनी गोदापात्र अक्षरशः खणून काढलं आहे.महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे वाळू माफिया मोकाट आहेत.बीड असो की परभणी अथवा कोणत्याही जिल्ह्यात वाळू माफियांना महसूल आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य असल्याने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून वाळू माफिया जोरात आहेत.
परभणी जिल्ह्यात देखील वाळू माफिया मोकाट असल्याचे लक्षात आल्यानंतर एसपी मीना यांच्या आदेशावरून पोलीस उपाधीक्षक तथा बीडचे सुपुत्र श्रेणीक लोढा यांनी शुक्रवारी पहाटे तीन वाजता गोदावरी नदीच्या पात्रात छापा घातला .यावेळी लोढा यांनी गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील वझुर (तालुका पूर्णा) वाळू धक्क्यावरून अवैध वाळू उपसा करणारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जवळपास ९८ वाळूमाफिया विरोधात शुक्रवारी (दि.१३ मे) पहाटे २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत प्रकरणात ३८ जणांना अटक करण्यात आली, तसेच तब्बल ७ कोटी ३० लक्ष ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रेणीक लोढा यांनी केलेल्या कारवाईत वझुर येथून २८ हायवा, १ बोट , ५ जेसीबी, अशा वाहनांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्या ठिकाणी ८ दुचाकी, १ चारचाकी असा एकूण जवळपास ७ कोटी ४० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत वगळता बाकीचे सगळे पोलीस उपाधीक्षक असोत की पोलीस निरीक्षक यांनी वाळू माफियांवर कारवाई करणे सोडूनदिले आहे.केवळ कुमावत हे एकटेच वाळू माफियांना धडा शिकवत आहेत.याच पद्धतीने परभणी जिल्ह्यात लोढा यांनी देखील धाडसी कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.