अंबाजोगाई- बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.या रोडरोमिओ विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील दिपाली रमेश लव्हारे हीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.गावातील अकबर शेख हा तिला सातत्याने जाणीवपूर्वक त्रास देत होता.दीपाली चे वडील परिवहन विभागात नोकरीला आहेत.
सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर दिपाली ने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.ही घटना उघडकीस आल्यानंतर दिपाली ची आई सुमित्रा यांच्या फिर्यादीवरून पोलिसात शेख अकबर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.