बीड – पुण्याहून बीडकडे परत येत असताना क्रेटा गाडीचा अपघात झाला.यामध्ये बीड शहरातील व्यापारी सुनिल,शंकर आणि सतीश टेकवाणी या तीन भावासह चौघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बीड येथील प्रथितयश व्यापारी सतीश टेकवाणी हे आपल्या दोन भावासह पुण्यालागेले होते.पुण्याहून क्रेटा गाडीने परत येत असताना धामणगाव नजीक गाडी रस्त्याच्या खाली गेली.हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये सतीश टेकवाणी,शंकर टेकवाणी,सुनील टेकवाणी हे तिघे भाऊ आणि अनएक जण असे चार जण मृत्युमुखी पडले.
बीड शहरात गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून जनरल स्टोर, बियर बार यासह इलेक्ट्रॉनिक व्यवसायत नावाजलेले टेकवाणी कुटुंब होते.एकाच कुटुंबातील तीन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.