बीड-दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागून चाळीस हजार रुपये घेण्याची कबुली देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षाकविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हदाखल केला आहे .
अंबाजोगाई पोलीस ठाण्यात नियुक्ती वर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल सूर्यवंशी याने फिर्यादीकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली .तडजोडी नंतर चाळीस हजार रुपये घेण्याचे मान्य केले.
या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली .विभागाने खात्री केल्यानंतर सूर्यवंशी यांच्याविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसात अंबाजोगाई ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली ही तिसरी कारवाई आहे.