आष्टी – कोर्टाचे निकाल आपल्या बाजूने लागलेले असताना देखील तलाठी,मंडळ अधिकारी ,तहसीलदार हे नाव न लावता पैशाची मागणी करतात या कारणावरून एका महिलेने अष्टीचे तहसीलदार यांच्या कक्षात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सदरील महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आशाबाई संतोष शिंदे वय 52 वर्ष रा.पिंपळा,ता.आष्टी,जि.बीड येथील रहिवासी असून,त्यांची पिंपळा येथे स.नं.293 मध्ये 1 हे. व 294 मधील क्षेञ 0.80 हे.आर असे एकूण साडेचार एकर जमिनीचा वाद अप्पर विभागीय आयुक्त कार्यालय यांचे आदेश प्रकरण क्र.2018/आरओआर/आर ई व्ही/61 दि.10/7/2018 आदेशाच्या नाराजीने प्रस्तुत पुनरलोकन अर्ज दाखल करण्यात आला होता.हे प्रकरण क्र.क्र.2018/आरओआर/आर ई व्ही/61या प्रकरणाबाबत मी पुन्हा दाखल केले होते.
त्याचा निकाल दि.3/12/2021 माझ्या बाजूने लागला असून,या निकालात स्पष्ट असे म्हटले आहे की,अर्जदार यांचा पुनरवालोकन अर्ज मान्य करण्यात येत आहे.या न्यायालयाचा आदेश क्र.
दि.10/07/2018 आदेश रद्द करण्यात येत आहे.अप्पर जिल्हाधिकारी बीड यांचा आदेश क्र.2017/सिडी/अपील/सीआर-26 दि.19/3/2018 आदेश कायम करण्यात येत आहे.आशा प्रकरचा निकाल 312/2021 रोजी अप्पर विभागीय आयुक्त क्र.2 यांनी दिला आहे.सदरचा आदेश आशाबाई संतोष शिंदे यांच्या हक्कात झाल्यामुळे फेर क्र.3655 मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय देण्यात आला आहे .मात्र तरीसुद्धा आपल्या नावाची नोंद होत नाही त्यामुळे या महिलेने जीव देण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.