May 26, 2022

बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू !

बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू !

शिरूर कासार – शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील दोरखडा शिवारात घडल्याने खळबळ उडाली आहे.

शिरुर कासार तालुक्यात भानकवाडी येथील दोरखडा शिवारात शेकाऱ्याने वाघुर लावलं होतं. यामध्ये बिबट्या अडकला. ही घटना शनिवार ( दि. ८ ) दुपारी ४ वाजता घडली. वाघोरित बिबट्या अडकल्याची वार्ता गावामध्ये पसरताच बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर सदरील घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली असता बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पंचनामा करुन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती बोरघरे, डॉ. मोहळकर, डॉ. लकडे, डॉ. आघाव या चौघांनी घटनास्थळी बिबट्याचे इन कॅमेरा शवविच्छेदन केले. यानंतर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click