बीड- मित्र मंडळाच्या माध्यमातून वंचित,बेरोजगार तरुणाईला सोबत घेऊन डाव टाकण्यासाठी मैदानात उतरलो आहे,परिवर्तन घडवायचे असेल अन हत्तीच्या माजलेल्या पिलाला जंगलात सोडायचे असेल तर साथ द्या अस म्हणत माजीमंत्री सुरेश नवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
बीडमध्ये माजीमंत्री सुरेश नवले मित्र मंडळ कार्यालयाचे उदघाटन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते झाले.यावेळी माजीमंत्री अर्जुन खोतकर,विनायक निम्हण,माणिकराव कोकाटे,माजी आ सुनील धांडे,सय्यद सलीम, राजेंद्र जगताप,जनार्धन तुपे,शिवाजीराव चोथे यांची उपस्थिती होती.
आपली भूमिका स्पष्ट करताना नवले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, कुसुमाग्रज,रवींद्रनाथ टागोर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे दाखले देत केंद्र सरकार च्या धोरणावर टीका केली.बीडमधील सत्ताधारी क्षीरसागर कुटुंबाचे नाव न घेता नवले यांनी टीका केली.
यावेळी अब्दुल सत्तार यांनी तसेच अर्जुन खोतकर यांनी नवले यांच्या या भूमिकेला साथ द्या अशी साद घातली.