बीड- जिल्ह्यातील गेवराई,परळी,आष्टी,माजलगाव तालुक्यातील वाळू पट्यातून करोडो रुपयांची बेकायदेशीर वाळू उपसली जात असताना महसूल,पोलीस आणि परिवहन विभाग बघ्याची भूमिका घेत आहेत.त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल तर बुडत आहेच पण नदीपात्राचे देखील वाळवंट होत आहे.
बीड जिल्ह्यात जेवढे प्रमुख पक्ष आहेत त्यातील बहुतांश पुढारी हे वाळू च्या धंद्यात आहेत.गेवराई भागात युध्दाजित पंडित असोत की विजयसिंह पंडित यांना विचारल्याशिवाय अन सोबत घेतल्याशिवाय वाळूचा कण देखील उचलता येत नाही.आष्टीत धस अँड कंपनी तर परळीत मुंडे आणि माजलगाव मध्ये सोळंके च्या परवानगी शिवाय पान हलत नाही.
जिल्ह्यात सगळ्यात जास्त वाळू उपसा हा गेवराई तालुक्यातून केला जातो.कुरण पिंप्री पासून गुंतेगाव,राजापूर पर्यंत प्रत्येक गावागावात वाळू उपसा केला जातो.वर्षातील किमान सहा आठ महिने बेकायदेशीर तर दोन महिने कायदेशीर वाळू उपसली जाते.
वाळू उपसा करताना कोणतेही नियम व अटी पाळल्या जात नाहीत कारण महसूल असो की पोलीस अथवा परिवहन विभागातील अधिकारी यांची तोंड पैशाने बंद केलेली असतात. हा प्रकार बंद करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी गोडापात्रात उतरून वाळू माफियांवर कारवाई करणे आवश्यक आहे.