May 26, 2022

परळीतील दहा सिंचन प्रकल्पांना मान्यता !

परळीतील दहा सिंचन प्रकल्पांना मान्यता !

मुंबई – परळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे करत असलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज परळी मतदारसंघातील प्रस्तावित 23 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देऊन त्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी विभागाला दिले आहेत.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आ. संजयभाऊ दौंड, मा. आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांसह जलसंपदा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत परळी मतदारसंघातील गोदावरी नदी वरील तारू गव्हाण बॅरेज अंबलवाडी प्रकल्प (उपसा सिंचन), अंबालवाडी, वसंत नगर, कासारी, गोवर्धन तांडा, वैतागवाडी, वाका, पडोली, रेवली, कन्हेरवाडी या दहा साठवण तलावांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देऊन मंजुरी देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रस्तावित यादीतील उर्वरित 13 प्रकल्पांच्या तांत्रिक बाबी तपासून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही विभागास दिले आहेत.

धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात सामान्य शेतकरी कष्टकरी वर्गाचे उत्पन्न वाढवुन त्यांचे राहणीमान उंचावण्याचा शब्द विधानसभा निवडणुकीत दिला होता. कमी पाऊस व सिंचनाच्या मर्यादित सोयी असलेल्या या क्षेत्रात सिंचनाच्या मुबलक सोयी उपलब्ध झाल्याने या भागातील शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात भरारी घेऊ शकणार आहे, यासाठी धनंजय मुंडे यांनी ‘मराठवाड्याचे भगीरथ’ ना. जयंत पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click