September 30, 2022

आरटीओ ,ट्रॅफिकच्या हप्तेखोरी मुळे वाळू माफिया बेलगाम !

आरटीओ ,ट्रॅफिकच्या हप्तेखोरी मुळे वाळू माफिया बेलगाम !

बीड- अधिकृत असो की अनधिकृत कोणत्याही वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवर नंबरच नसतो,गाड्या ओव्हरलोड असतात,जीपीएस सिस्टीम नसते,पियुसी नसते तरीही आरटीओ असो की ट्रॅफिक पोलीस या गाड्यावर कारवाई कधीच करत नाहीत.कारण एकच लक्ष्मीदर्शन. प्रतिगाडी किमान पंधरा तर कमाल पन्नास हजार रुपये मिळाल्यावर कोण गाड्या चेक करण्याचा ताण घेईल म्हणा.

बीड जिल्ह्यात सर्रास वाळू उपसा बारमाही सुरू आहे.टेंडर झालेले असो की नसो,पुढारी अन त्यांचे बगलबच्चे सर्रास वाळू उपसा करतात.महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या तोंडात पैशाचा बोळा कोंबलेला असल्याने ते हूं की चू करत नाहीत.गावच्या सरपंचापसून ते तलाठी,ग्रामसेवक,मंडळ अधिकारी हे सगळेच मॅनेज असतात.काही काही तलाठी,मंडळ अधिकारी अन पोलीस निरीक्षक, हेडकोन्स्टेबल हे पाच दहा टक्यात पार्टनर असतात.

महसूल अन पोलीस यंत्रणा सडलेली अन मॅनेज होणारी असल्याने त्यांना खिशात कसे घालायचे हे वाळू माफियांना चांगलेच माहीत आहे.राहिला प्रश्न आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांचा.वाळू उपसा अधिकृत असो की अनधिकृत, कोणत्याही गाड्यावर नंबर प्लेट दिसूनच येत नाही.नंबर प्लेट असेल तर त्यावर चिखल किंवा माती चिकटवलेली असते.

गोदा पात्रापासून ते जिल्ह्यात कुठेही वाळू वाहतूक करताना एक दोन टोलनाके,एक दोन शहरे,चौक लागतात.हायवे पेट्रोलिंग करणारे पोलीस देखील असतात.मात्र हे कोणीच या वाळू माफियांच्या गाड्यावर कारवाई करताना दिसत नाहीत.

बाहेरच्या राज्यातील ट्रक, कंटेनर,प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप,टमटम यांच्याकडून दहा,वीस,पन्नास, शंभर रुपये गोळा करण्यासाठी दिवसभर थांबणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने,नंबर नसलेली वाहने दिसतच नाहीत.आरटीओ कार्यालयातील इन्स्पेक्टर असोत की इतर अधिकारी हे तर घरूनच कारभार हाकत असल्याचे चित्र आहे.

आरटीओ ने ओव्हरलोड मुळे एखाद्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्याचे गेल्या अनेक वर्षात दिसलेले नाही.ट्रॅफिक पोलीस,संबंधित पोलीस ठाण्याचे निरीक्षक,त्यांचा मुन्शी,आरटीओ अधिकारी या सगळ्यांचे हप्ते बांधलेले असल्याने नंबर प्लेट असो की नसो,हे सगळे वाळू माफिया बिनधास्त वाळू वाहतूक करत असल्याचे दिसून येते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click