बीड – रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर गरजु कुटूंबांची ईद अधिक गोड करण्याचा एक प्रयत्न म्हणून राजयोग फाऊंडेशन च्या माध्यमातून शिरखुर्मा साहित्याचे ५०० किट वाटप करण्यात आले.राजयोग ने आजपर्यंत कोरोना काळ असो की दिवाळीचा सण हजारो गरीब कुटुंबाच्या घरात आनंद पेरण्याचे काम केले आहे.सामाजिक बांधिलकी जपण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राजयोग फाउंडेशन चे संस्थापक, पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धुत व शिवसेना नगरसेवक शुभम धुत यांच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेतून गत ५ वर्षांपासून हजारो कुटुंबांना दिवाळीला फराळ वाटप व ३ वर्षांपासून रमजान ईद निमीत्त शेकडो कुटुंबांना शिरखुर्मा साहित्य वाटप चा हा हिंदू-मुस्लिम एकोपा वाढवणारा उपक्रम अविरत सुरु आहे.
यावर्षी न.प.सदस्य डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत या साहित्य वाटपाची सुरुवात करण्यात आली. व त्यानंतर शहरातील विविध भागातील जाऊन नगरसेवक शुभम धुत व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरखुर्मा किट वाटप केले. यामधे शहरातील विविध भागातील अपंग, निराधार, रोजनदारी करणार्या गरजु कुटुंबांसह कब्रस्तान ची देखभाल करणाऱ्या कुटुंबांचाही समावेश आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन मधे सर्वकाही बंद असताना राजयोग फाउंडेशन च्या माध्यमातून सतत ५० दिवस मदतकार्य सुरु होते, व त्या माध्यमातून ३००० पेक्षा जास्त कुटुंबांना अन्नधान्य व किराणा साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे २ वर्ष लॉकडाउन असल्याने ईद मोठ्या प्रमाणात साजरा झाली नाही, त्यावेळी देखील लॉकडाउन मधे देखील राजयोग फाऊंडेशन च्या माध्यमातून शेकडो गरजु कुटुंबांना शिरखुर्म्याचे साहित्य उपलब्ध करुन रमजान ईद चा आनंद द्विगुणित करण्यात आला होता.